भजनी मालिका
← भजनांकडे परत

यमपुरी त्यांणीं वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला

yamapuri tyannin vasavili jana | uchchhed bhajana vidhi kela

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
यमपुरी त्यांणीं वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला ॥१॥ अवघड कोणी न करी सांगतां । सुलभ बहुतां गोड वाटे ॥ध्रु.॥ काय ते नेणते होते मागें ॠषी । आधार लोकांसी ग्रंथ केले ॥२॥ द्रव्य दारा कोणें स्थापियेलें धन । पिंडाचें पाळण विषयभोग ॥३॥ तुका म्हणे दोहीं ठायीं हा फजित । पावे यमदूतजना हातीं ॥४॥