भजनी मालिका

भजने

म्हणे बा आतां करिशील कायी । एकाला ये ठायीं येऊनियां ॥१॥ वय हें केवढें बुद्धि हे केवढी । वांयां काढाकाढी तपाची कां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

म्हणे बा गौळणीचिया रागें । तुज म्यां बांधलें रे प्रसंगें । तंव त्वां उपटूनियां श्रीरंगें । उखळ येथें अडकविलें ॥१॥ परी तें नयेचि तुज उगवितां । म्हणोनियां बळें ओढिलें ताता । तंव हे वृक्ष पडिले रे भाग्यवंता । अदृष्टें आमुच्या वांचलासी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

म्हणे मी येईन तुम्हांसवें । गावा न्यावें आपुलिया ॥१॥ ठाकेल ते करीन सेवा । माझा न करावा अव्हेर ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

म्हणे विठोजी शंकराचा । प्रत्यक्ष अवतार तुझा साचा । स्तुति केली असे वाचा । विस्मयाचा पूर मज ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

म्हणे विठ्ठल ब्रम्ह नव्हे । त्याचे बोल नाइकावे ॥१॥ मग तो हो का कोणी एक । आदि करोनि ब्रह्मादिक ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणोनि याचिया श्रवणें पाठें । वचनें पालटे देहबुध्दी ॥१॥ वैराग्याची राणीव जोडें । ज्ञानाचें उघडें निजमंदिर ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

म्हणोनियां तेथें उगाचि उभा । यावया जवळी पहननाभा । तोहि सर्वसाक्षी ओथंबा । जाणे हदगत केशियाचें ॥१॥ मग चालत मंजुळ चाली । हळूहळूचि गेला जवळी । लगाम धरुनिया निज करतळी । हातें कुरवाळी मुखांतरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

म्हणोनिया मीच अवतरीलो समज। चिदंबर नाम धरुनीया ।। जाहले चिदंबर पांडुरंग तोची ॥१॥ माझे आईचे नांव संतुवाई जाणा सांगते हो खूणा तुम्हालागी ।।२।।

रचनाकार: संत विठाबाई

म्हणोनियां शब्द न पवेचि तत्वतां । बुध्दीचिया माथां वळघे कोण ॥१॥ मना पवना केंवि घडेल संचार । श्रुती परात्पर म्हणती ज्यातें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

म्हणोनीया मीच अवतरीलो समज चिदंबर नाम धरुनीया ।।१।। कुंदगोळी असतो ब्राह्मणवेषेने। जावे ह्या वाटेने म्हणती मजसी ||२|| रा

रचनाकार: संत विठाबाई

म्हैस वेलि देतां सेलि होंसि कासाविस । येईल पुढें थेटे पडसें आयुष्याचा नाश ॥१॥ बुड हरि सवें । देहभाव उरनिभावें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

म्हैसीपुत्रामुखें बोलवणें श्रुती । चालवणें भिंती बैसोनियां ॥१॥ नव्हे हा सामान्य महिमा संतांचा । नैवेदय हातींचा मूर्ती जेवी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यज्ञ भूतांच्या पाळणा । भेद कार्य कारणा । पावावया उपासना । ब्रम्हस्थानीं प्रस्थान ॥१॥ एक परी पडिलें भागीं । फळ बीजाचिये अंगीं । धन्य तोचि जगीं । आदि अंत सांभाळी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

यज्ञ याग दान व्रत उद्यापन । हें नेणें मी साधन काय करूं ॥१॥ जप तप होम स्वधर्माचरण । नव्हे तीर्थाटण कांहीं मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

यज्ञनिमित्त तें शरिरासी बंधन । कां रे तृष्णा वांयांविण वाढविली ॥१॥ नव्हे ते भक्ती परलोकसाधन । विषयांनीं बंधन केलें तुज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम