भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणे पाचारा भूदेवा धर्म म्हणे जावें भीमा

mhane pachara bhudeva dharma mhane javen bhima

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
म्हणे पाचारा भूदेवा धर्म म्हणे जावें भीमा ।।१।। गंगातिरासी येऊन । नमियेले ऋषिजन ॥२॥ त्वरा करा ऋषिजन । पात्रीं विस्तारलें अन्न ।। ३॥ म्हणती बापा ऐसें नव्हे पोट आहे किंवा काय ।।४।। आतां स्वस्थ प्रसादें तृप्त झाली ऋषिदें||५|| कैचा नष्ट दुर्योधनें आम्हां धाडिलें दुर्जनें । ॥६॥ कही करितां अंबऋषी । चक्र लागलें पाठीसी।।७।। तेचि गोष्टी झाली आतां। शीघ्र पळावें तत्त्वतां ।।८।। माझा आशीर्वाद धर्मा नित्य कल्याणचि तुम्हां ।। ९।। ऋषि निघाले तेथुनी । म्हणे नामयाची जनी ।। १० ।।