भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणोनि तुझें रुप देखिलिया दिठी

mhanoni tujhen rup dekhiliya dithi

म्हणोनि तुझें रुप देखिलिया दिठी । जयसच्चिदानंदपदेंसी मिठी । ओंकारेंसी त्रिपुटी । न साहे तो तूं सगुण जगजेठी ॥ या दृष्टीचेनि सुखें माये ह्रदयीं भासलें रुप । शेखीं पाहतां कां आम्हा चाळविसी रया ॥१॥ आतां सेवेलागीं सेवा करणें कोणाच्या अंगें । स्वामीपणें जगीं होउनि ठेले ॥२॥ ते सांवळिये प्रमाण न दिसे अनुआन । शेखीं ध्यानीं विरालें ते मन गे माये ॥ रुप खुंतलें पण हाचि हा संपूर्ण । तेथें द्वैताद्वैतापण हारपलें रया ॥३॥ आतां बुध्दियोग इंद्रियांचा तो तूं गोपवेषे साचा । भक्तियोगाचा सौरसु दाविसी आतां । बापरखुमादेवीवरा विठ्ठलाच्या पायी सुख । तेंच दरुशन येक जालें रया ॥४॥