भजनी मालिका
← भजनांकडे परत

यज्ञनिमित्त तें शरिरासी बंधन । कां रे तृष्णा वांयांविण वाढविली

yadnyanimitta ten sharirasi bandhan | kan re trushna vanyanvin vadhavili

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
यज्ञनिमित्त तें शरिरासी बंधन । कां रे तृष्णा वांयांविण वाढविली ॥१॥ नव्हे ते भक्ती परलोकसाधन । विषयांनीं बंधन केलें तुज ॥ध्रु.॥ आशा धरूनि फळाची । तीर्थी व्रतीं मुक्ती कैंचि ॥२॥ तुका म्हणे सिणसी वांया । शरण न वजतां पंढरिराया ॥३॥