भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हैसीपुत्रामुखें बोलवणें श्रुती । चालवणें भिंती बैसोनियां

mhaisiputramukhen bolavanen shruti | chalavanen bhinti baisoniyan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
म्हैसीपुत्रामुखें बोलवणें श्रुती । चालवणें भिंती बैसोनियां ॥१॥ नव्हे हा सामान्य महिमा संतांचा । नैवेदय हातींचा मूर्ती जेवी ॥२॥ उदकामाजी वह्या ॥ ठेऊनी कोरडया । दाखवणें रोकडया विश्वजनां ॥३॥ निळा म्हणे तिहीं संगेंचीं तारणें । दीने उध्दरणें नवल कोण ॥४॥