भजनी मालिका
← भजनांकडे परत

यमधर्मही इच्छी भेटी । हरिभक्तां दृष्टीं पहावया

yamadharmahi ichchhi bheti | haribhaktan drushtin pahavaya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यमधर्मही इच्छी भेटी । हरिभक्तां दृष्टीं पहावया ॥१॥ म्हणे त्यांच्या मुखें कथा । होईन ऐकतां पावन मी ॥२॥ जीहीं भुलविला हरी । कीर्तनगजरीं करुनियां ॥३॥ निळा म्हणे धन्य ते वाणी । गर्जत गुणीं सर्वदां ॥४॥