भजनी मालिका
← भजनांकडे परत

यथार्थवादें तुज न वर्णवे कदा । बोलतों ते निंदा करितों तुझी

yatharthavaden tuj na varnave kada | bolaton te ninda kariton tujhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
यथार्थवादें तुज न वर्णवे कदा । बोलतों ते निंदा करितों तुझी । वेदश्रुति तुज नेणती कोणी । चोवीस ठेंगणीं धांडोळितां ॥१॥ आतां मज क्षमा करावें देवा । सलगी ते केशवा बोलियेलों ॥ध्रु.॥ सगुण कीं साकार निर्गुण कीं निराकार । न कळे हा पार वेदां श्रुतीं । तो आह्मी भावें केलासी लहान । ठेवूनियां नांवें पाचारितों ॥२॥ सहस्रमुखें शेष सीणला स्तवितां । पार न कळतां ब्रह्मा ठेला । तेथें माझी देहबुद्धी तें काई । थोर मी अन्यायी तुका म्हणे ॥३॥