भजनी मालिका
← भजनांकडे परत

यमधर्म सांगे दूता

yamadharma sange duta

यमधर्म सांगे दूता । परिसावी निजकथा । जेथें रामनाम वार्ता । तया देशा नवजावे ॥१॥ नाम महादोषां हरण । नाम पतीतपावन । नाम कलिमळदहन । भवबंधनमोचक ॥२॥ जये देशीं नाम वसे । नाम श्रवणीं विश्वासे । गाती नाचती उल्हासें । झणी पाहाल तयाकडे ॥३॥ जये ग्रामीं हरिपूजन । जये नगरीं हरिकीर्तन । तेथें गेलिया बंधन । तुह्मी पावाल त्रिशुध्दि ॥४॥ जये देशी गरुडटका । कुंचे ध्वज आणि पताका । जेथें संतजन आइका । तया देशा नव जावे ॥५॥ आणिक एक ऐकारे विचारु । जेथें रामनामाचा गजरु । तेथें बापरखुमादेविवरु । तयाबळें नागविती ॥६॥