भजनी मालिका

भजने

गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवे भेटी केली तेणें ॥१॥ सहज गुण जयाचीये देहीं । पालट तो कांहीं नव्हे तया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गाढवासांगती सुकाळ लाथांचा । श्रम जाणिवेचा वायां जाय ॥१॥ आम्हांसी तों एक प्रेमाचे कारण । नामाचें चिंतन विठोबाच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गाणीं मी गाईलों भाटीं वाखाणिलों । जन्मोनियां जालों दास तुझा ॥१॥ आतां माझी लाज राखें नारायणा । झणीं केविलवाणा दिसों देसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गाण्याचें कीर्तन वाखणिलें । जाणिवेचें ज्ञान तें जाणिवेनें खादलें ॥१॥ भवार्णव हा अवघा उभारी । तो कळे जाणिवेवरी रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गातां ऐकतां कांटाळा जो करी । वास त्या अघोरीं कुंभपाकीं ॥१॥ रागें यमधर्म जाचविती तया । तु दिलें कासया मुख कान ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गाती ओंव्या कामें करितां सकळें । हालवितां बाळें देवावरी ॥१॥ ॠद्धिसिद्धी दासी दारीं ओळंगती । सकळ संपत्ति सर्वां घरीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

गाय नामपाठ न करीं आळस । हातां येईल सौरस इच्छिलें तें ॥१॥ न करी आळस आलिया संसारीं । नामपाठ निरंतरीं गाय सदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गायत्री मंत्राचा मानुनी कंटाळा । जाय तो वेताळा पूजावया ॥१॥ देवाचें पूजन करितां वाटे दुःख । आवडीं देख भांग घोटी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गायत्री विकोनी पोट जे जाळिती । तया होय गति यमलोकीं ॥१॥ कन्येचा जे नर करिती विकरा । ते जाती अघोरा नरकपाता ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम