भजनी मालिका
← भजनांकडे परत

गातां विठोबाची कीर्ती । महापातकें जळती

gatan vithobachi kirti | mahapataken jalati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गातां विठोबाची कीर्ती । महापातकें जळती ॥१॥ सर्व सुखाचा आगर । उभा असे विटेवर ॥२॥ आठवितां पाय त्याचे । मग तुम्हां भय कैंचें ॥३॥ कायावाचामनें भाव । जनी म्हणे गावा देव ॥४॥