भजनी मालिका
← भजनांकडे परत

गायत्री विकोनी पोट जे जाळिती । तया होय गति यमलोकीं

gayatri vikoni pot je jaliti | taya hoy gati yamalokin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गायत्री विकोनी पोट जे जाळिती । तया होय गति यमलोकीं ॥१॥ कन्येचा जे नर करिती विकरा । ते जाती अघोरा नरकपाता ॥ध्रु.॥ नाम गाऊनियां द्रव्य जे मागती । नेणों तयां गति कैसी होय ॥२॥ कैसी होय गती तेच हो जाणती । आम्हासी संगती न लगे त्यांची ॥३॥ आमुचा सांगाती आहे तो श्रीहरी । न लगे दुराचारी तुका म्हणे ॥४॥