भजनी मालिका
← भजनांकडे परत

गातां ऐकतां कांटाळा जो करी । वास त्या अघोरीं कुंभपाकीं

gatan aikatan kantala jo kari | vas tya aghorin kumbhapakin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गातां ऐकतां कांटाळा जो करी । वास त्या अघोरीं कुंभपाकीं ॥१॥ रागें यमधर्म जाचविती तया । तु दिलें कासया मुख कान ॥ध्रु.॥ विषयांच्या सुखें अखंड जगासी । न वजे एकादशी जागरणा ॥२॥ वेचूनियां द्रव्य सेवी मद्यपान । नाहीं दिलें अन्न अतीतासी ॥३॥ तीर्थाटण नाहीं केले उपकार । पाळिलें शरीर पुष्ट लोभें ॥४॥ तुका म्हणे मग केला साहे दंड । नाइकती लंड सांगितलें ॥५॥