भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाते श्रोते आणि पाहाते

gate shrote ani pahate

गाते श्रोते आणि पाहाते । चतुर विनोदि दुश्चिते । सोहंभावी पूर्णज्ञाते या सकळांतें विनवणी ॥१॥ करा विठ्ठलस्मरण । नामरुपीं अनुसंधान । जाणोनि भक्तां भवलक्षण । जघनप्राण दावितो ॥२॥ पुंडलीकाच्या भावार्था । गोकुळींहुनी जाला येता । निजप्रेमभक्ति भक्तां । घ्या घ्या आतां । म्हणतसे ॥३॥ मी माझे आणि तुझें । न धरी टाकी परतें ओझें । भावबळें फ़ळती बिजे । बापरखुमादेविवर विठ्ठलीं ॥४॥