भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाय नामपाठ न करीं आळस । हातां येईल सौरस इच्छिलें तें

gay namapath na karin alas | hatan yeil sauras ichchhilen ten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गाय नामपाठ न करीं आळस । हातां येईल सौरस इच्छिलें तें ॥१॥ न करी आळस आलिया संसारीं । नामपाठ निरंतरीं गाय सदा ॥२॥ जनार्दनाचा एक प्रेमें विनटला । नामपाठें झाला कृतकृत्य ॥३॥