भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाण्याचें कीर्तन वाखणिलें । जाणिवेचें ज्ञान तें जाणिवेनें खादलें

ganyachen kirtan vakhanilen | janivechen dnyan ten janivenen khadalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गाण्याचें कीर्तन वाखणिलें । जाणिवेचें ज्ञान तें जाणिवेनें खादलें ॥१॥ भवार्णव हा अवघा उभारी । तो कळे जाणिवेवरी रे ॥२॥ पंडिताचा बोध विध्वंसी वाद । तापसाचें तप निर्दाळी क्रोध ॥३॥ योगियाचा योग नाडियेला सिद्धि । अभिमान नाडी सज्ञान बुद्धी ॥४॥ कर्माकर्म नाडी वर्णाश्रम । संबंधी विषम विकल्प करी ॥५॥ एकाजनर्दनीं भगवत कृपा पुर्ण । निरभिमानें चरण धरियेलें ॥६॥