भजनी मालिका

भजने

आणिक साधन नाहीं नाहीं जगीं । नामपाठ वेगीं गाय जना ॥१॥ तुटली बंधनें खुंटलें पतन । नामपाठ खुण वैकुंठाची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आणिक साधनीं नको गुंतुं मना । धरी या चरणीं । विठोबाच्या ॥१॥ वाउगा बोभाट कासया खटपट । पंढरीची वाट सोपी बहु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आणिक हे ग्रंथ प्रमाण अष्टोतरशें । वदिलें स्वरसें गुरुकृपें ॥१॥ रामायण अदभुत सप्तकांड साचार । तंव प्रयाण विचार आरंभिला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आणिकही उदंड संतजन । राहिले व्यापून महीतळीं ॥१॥ नामेंचि पावन केलें दोषी । उध्दार आणिकांशीं करुनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण । मुंढा वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥१॥ तैसा नव्हे चाळा आवरीं मन डोळा । पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आणिकां छळावया जालासी शाहाणा । स्वहिता घातले खानें । आडिके पैके करूनि सायास । कृपणें सांचलें धन । न जिरे क्षीर श्वानासी भिक्षतां । याती तयाचा गुण ।

रचनाकार: संत तुकाराम

आणिकांची आस नको करूं मना । चिंती तूं चरणा विठोबाच्या ॥१॥ वाचे नाम गाये वाचे नाम गाये । वाचे नाम गाये विठोबाचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आणिकांची सेवा करावी शरीरें । तीं येथें उत्तरे कोरडीं च ॥१॥ ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा । नेघे येरझारा सेवकाच्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आणिकांची स्तुति आम्हां ब्रम्हहत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥१॥ आम्हां विष्णुदासां एकविध भाव । न म्हणों या देव आणिकांसि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आणिकांचें मत नका पडुं तेथ । भजा पंढरीनाथ एकभावें ॥१॥ काय होणार तें होईल देहांचें । नाशिवंत साचें काय हातीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आणिकाचें मतें सायास न करणें । आम्हांसी पाहुणे पंढरीराव ॥१॥ डोळां भरुनिया पाहिलें देवासी । तेणें चौर्‍यायंशी चुकली सत्य ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आणिकाचे मनीं आणीक संकल्प । न धरा विकल्प वासनेचा ॥१॥ नका यातायाती वाउगी फजिती । उगवा गोवांगुंती आपुलाली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदुःख दोष अंगीं लागे ॥१॥ ऐसें मनीं वाहूं नयेती संकल्प । करूं नये पाप भांडवल ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम