भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकांचें मत नका पडुं तेथ । भजा पंढरीनाथ एकभावें

anikanchen mat naka padun teth | bhaja pandharinath ekabhaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आणिकांचें मत नका पडुं तेथ । भजा पंढरीनाथ एकभावें ॥१॥ काय होणार तें होईल देहांचें । नाशिवंत साचें काय हातीं ॥२॥ मृतिकेचा गोला गोळाचि मृत्तिका । वाउगाचि देखा शीण वाहे ॥३॥ घट मठ जेवीं आकाश निराळें । एका जनार्दनीं खेळें अकळची ॥४॥