भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकाचे मनीं आणीक संकल्प । न धरा विकल्प वासनेचा

anikache manin anik sankalpa | na dhara vikalpa vasanecha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आणिकाचे मनीं आणीक संकल्प । न धरा विकल्प वासनेचा ॥१॥ नका यातायाती वाउगी फजिती । उगवा गोवांगुंती आपुलाली ॥२॥ एका जनार्दनीं एकचि स्मरा । जन्म वेरझारा खंड होती ॥३॥