भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिक साधनीं नको गुंतुं मना । धरी या चरणीं । विठोबाच्या

anik sadhanin nako guntun mana | dhari ya charanin | vithobachya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आणिक साधनीं नको गुंतुं मना । धरी या चरणीं । विठोबाच्या ॥१॥ वाउगा बोभाट कासया खटपट । पंढरीची वाट सोपी बहु ॥२॥ एका जनार्दनीं कायावाचामनें । सतत राहणें संतापायीं ॥३॥