भजनी मालिका

भजने

किती किती जन्म किती किती फेरे । किती किती अघोरें भोगिताती ॥१॥ न सुटे न सुटे न सुटे बंधन । याची आठवण धरा चित्तीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

किती तुजपाशीं देऊं परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा॥१॥ आतां माझें हातीं देई हित । करीं माझें चित्त समाधान॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

किती देवा तुला यावें काकुलती । काय या संचितीं लिहिलें असे ॥१॥ केली कांहो सांडी माझी ह्रषिकेशी । आम्ही कोणापाशीं तोंड वासूं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

किती धांवाधांवी करावी कोरडी । न कळें कांहीं जोडी हानि लाभ ॥१॥ जे जे करितों तें तें फलकट । वाउगेंचि कष्ट दु:ख भोगी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

किती बोलूं किती सांगूं । नायकती त्यांचा न सरे पांगु ॥१॥ जातां न राहाती आडवाटे । मोडती काटें कर्मधर्म ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

किती या काळाचा सोसावा वळसा । लागला सरिसा पाठोपाठीं ॥१॥ लक्ष चौऱ्यांशीची करा सोडवण । रिघा या शरण पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

किती रांडवडे । घालूनि व्हाल रे बापुडे । संसाराचे भिडे । कासावीस झालेती ॥१॥ माझ्या स्वामी शरण रिघा । कृपाळुवा पांडुरंगा । ठेवी अंगसंगा । विश्वासियां जवळी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

किती विवंचना करीतसें जीवीं । मन धांवडवी दाही दिशा ॥१॥ कोणा एका भावें तुम्ही अंगीकार । करावा विचार या च साटीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

किती वेळां जन्म किती वेळां मृत्यु । हाचि न कळे अंतु भाग्यहीना ॥१॥ जन्मोनीं संसार मानितां बरवा । परि या राघवा शरण न जाय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

किती सांगों तरी नाईकती बटकीचे । पुढे सिंदळीचे रडतील ॥१॥ नका नका करूं रांडेची संगती । नेईल अधोगती घाली यम ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

किती सोसिती करंटीं । नेणों संसाराची आटी । सर्वकाळ पोटीं । चिंतेची हळहळ ॥१॥ रिकामिया तोंडें राम । काय उच्चारितां श्रम । उफराटा भ्रम । गोवा विषय माजिरा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कीटकीतें भयें स्वयें भृंगी ध्यातां । तैसा तूं अनंता करी आतां ॥१॥ भजनें पाठविलें श्रीहरिरूपासी । नेतो वैकुंठासी नारायण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कीर्तन ऐकावया भुलले श्रवण । श्रीमुख लोचन देखावया ॥१॥ उदित हें भाग्य होईल कोणे काळीं । चित्त तळमळी म्हणऊनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम