भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तन ऐकावया भुलले श्रवण । श्रीमुख लोचन देखावया

kirtan aikavaya bhulale shravan | shrimukh lochan dekhavaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कीर्तन ऐकावया भुलले श्रवण । श्रीमुख लोचन देखावया ॥१॥ उदित हें भाग्य होईल कोणे काळीं । चित्त तळमळी म्हणऊनि ॥ध्रु.॥ उतावीळ बाह्या भेटिलागीं दंड । लोटांगणीं धड जावयासी ॥२॥ तुका म्हणे माथा ठेवीन चरणीं । होतील पारणी इंद्रियांची ॥३॥