भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती चौघाचारें । येथें गोविलीं वेव्हारें

kiti chaughacharen | yethen govilin vevharen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
किती चौघाचारें । येथें गोविलीं वेव्हारें ॥१॥ असे बांधविले गळे । होऊं न सकती निराळे ॥ध्रु.॥ आपलें आपण । केलें कां नाहीं जतन ॥२॥ तुका म्हणे खंडदंडें । येरझारीं लपती लंडें ॥३॥