भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती तरी चिंता करुं । धीर धरुं कोठवरी

kiti tari chinta karun | dhir dharun kothavari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
किती तरी चिंता करुं । धीर धरुं कोठवरी ॥१॥ आला दिवस बुडोनी जातो । अतिशयचि राहतो केला तो ॥२॥ निश्चयें माझा अव्हेर केला । यावरी विठठला कळों आलें ॥३॥ निळा म्हणे आधार नेदा । कांहिचि गोविंदा चित्तसी ॥४॥