भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती धांवाधांवी करावी कोरडी । न कळें कांहीं जोडी हानि लाभ

kiti dhanvadhanvi karavi koradi | na kalen kanhin jodi hani labh

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
किती धांवाधांवी करावी कोरडी । न कळें कांहीं जोडी हानि लाभ ॥१॥ जे जे करितों तें तें फलकट । वाउगेंचि कष्ट दु:ख भोगी ॥२॥ निवांत बैसोनी नामाचें चिंतन । करूं जातां मन स्थिर नाहीं ॥३॥ दान धर्म करूं तो नाहीं धन पदरीं । जन्माचा भिकारी होउनी ठेलों ॥४॥ चोखा म्हणे ऐसा करंटा मी देवा । काय तुझी सेवा करूं आतां ॥५॥