भजनी मालिका

भजने

अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अंतींचा लाभु आधींच साधिजे । देह असता कीजे हरिभक्ती ॥१॥ आदि मध्य अंतु तोचि हा व्यापकु । विश्वप्रतिपा-ळकु नारायण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अदृष्टी असेल जें जें वेळे । तें तें मिळेल तें तें काळें ॥१॥ ऐशी प्रारब्धाची गती । ब्रह्मादिकां न चुकतीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अद्वय चिद्वय झालें चि कारण । धरिलें नारायणें भक्तिसुख ॥१॥ अपरोक्ष आकार झाला चतुर्भुज । एकतत्व बीज भिन्न नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अद्वैत अंबुला परणिला देखा । दुसरा विचार सांडिला ऐका ॥१॥ सांडिला पै घराचारु । दुसरा विचारु नाहीं केला ॥२॥

अद्वैत सुख कैसेनि आतुडे । जंववरी नसंडे मीतूं-पण ॥१॥ शब्द चित्र कथा सांगती पाल्हाळ । मन नाहीं के-वळ विठ्ठलदेवीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अद्वैतीं तों नाही । माझे समाधान हेंची अनुष्ठान नाम तुझे ॥१॥ करुनी उचित देई हेची दान । आवडे कीर्तन नाम तुझे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अंधकारीं प्रकाश दावी । दिप रवीपुढें मिथ्या ॥१॥ तैशीं प्राप्तापुढें ज्ञानें । युक्तिचीं दिनें लेवासे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अधमाचें चित्त अहंकारीं मन । उपदेश शीण तया केला ॥१॥ पापियाचें मन न करी आचार । विधवे शृंगार व्यर्थ केला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अधरींचें अमृत सेविसी एकलारे । काय पुण्य केलें रे नेणों पावया ॥१॥ तुळशीच्या माळा शोभति गोपाळा । तयाहूनि आगळा पावया तूं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अधर्में अदृष्टांचें चिन्ह । विपरीत वचन तें ऐका ॥१॥ भांडारीं ठेविला कापूर उडे । समुद्रामाजीं तारूं बुडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ