भजनी मालिका
← भजनांकडे परत

अद्वैत सुख कैसेनि आतुडे । जंववरी नसंडे मीतूं-पण

advait sukh kaiseni atude | janvavari nasande mitun-pan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अद्वैत सुख कैसेनि आतुडे । जंववरी नसंडे मीतूं-पण ॥१॥ शब्द चित्र कथा सांगती पाल्हाळ । मन नाहीं के-वळ विठ्ठलदेवीं ॥२॥ अणुचें प्रमाण असतां दुजेपण । मेरुतें समान देईल दु:ख ॥३॥ नामा ह्मणे सर्व आत्मरूप पाहीं । तरीच ठायींच्या ठायीं निवशील ॥४॥