भजनी मालिका
← भजनांकडे परत

अधमाचें चित्त अहंकारीं मन । उपदेश शीण तया केला

adhamachen chitta ahankarin man | upadesh shin taya kela

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अधमाचें चित्त अहंकारीं मन । उपदेश शीण तया केला ॥१॥ पापियाचें मन न करी आचार । विधवे शृंगार व्यर्थ केला ॥ध्रु.॥ अधमाचें चित्त दुश्चित्त ऐकेना । वांयां वीण मना करूंनी काय ॥२॥ गर्धबासी दिली चंदनाची उटी । केशर लल्हाटीं शुकराच्या॥३॥ पतिवंचकेसी सांगतां उदंड । परि तें पाषांड तिचे मनीं ॥४॥ तुका म्हणे तैसें अभावीका सांगतां । वाउगा चि चित्ता सीण होय ॥५॥