भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

कृपाळु म्हणोनि बोलती पुराणें । निर्धार वचनें यांचीं मज ॥१॥ आणीक उपाय नेणें मी कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे तैसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हें चि कृपादान तुमचें मज ॥१॥ आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कृपावंत कोप न धरावा । चित्ती छळू विक्रोक्ति स्तुती करू ॥१॥ आम्ही तुझा पार काय जाणो देवा । नेणो कैसी सेवा करावी ते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कृपावंता दुजें नाहीं तुम्हां पोटीं । लाडें बोलें गोठी सुख मातें ॥१॥ घेउनि भातुकें लागसील पाठी । लाविसील ओंठीं ब्रम्हरस ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कृपावंतें हाक दिली सकळिकां । माजिया रे नका राहों कोणी ॥१॥ निघाले या भेणे पाउसाच्या जन । देखे गोवर्धन उचलिला ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कृपेचें उत्तर देवाचा प्रसाद । आनंदीं आनंद वाढवावा ॥१॥ बहुतांच्या भाग्यें लागलें जाहाज । येथें आतां काज लवलाहो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कृपेचे सागर हे साधुजन । तिंहीं कृपादान केलें मज ॥१॥ बोबडे वाणीचा केला अंगीकार । तेणें माझा स्थिर केला जीव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कृष्ण ध्यातां चित्तीं कृष्ण गातां गीतीं । ते ही कृष्ण होती कृष्णध्यानें ॥१॥ आसनीं शयनीं भोजनीं जेवितां । म्हणारे भोगिता नारायण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥ कृष्ण माझा गुरू कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारू भवनदीची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी म्हणे ॥१॥ म्हणे कृष्णाविण कैसें तुम्हां गमे । वळि हा करमे वांयांविण ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कृष्णाचिया सुखें भुक नाहीं तहान । सदा समाधान सकळांचें ॥१॥ कळलें चि नाहीं झाले किती दिस । बाहेरिल वास विसरलीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कृष्णांजनें जाले सोज्वळ लोचन । तेणें दिले वान निवडुनी ॥१॥ निरोपाच्या मापें करीं लडबड । त्याचें त्यानें गोड नारायणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

केला अंगीकार पंढरीच्या देवें । आतां काय करिती काळ मशक मानवें ॥१॥ घातलीं बाहेर तीं भय होतें ज्यानें । बैसला आपण तेथें घालुनियां ठाणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

केला कइवाड संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें ॥१॥ काय जीवित्वाची धरुनियां आशा । व्हावें गर्भवासा पात्र भेणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

केला पुढें हरी अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसे थाट चाले ॥१॥ थाट चाले गाईं गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तयां सोयी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम