भजनी मालिका
← भजनांकडे परत

केला कइवाड संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें

kela kaivad santanchya adharen | anubhaven kharen kalon alen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
केला कइवाड संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें ॥१॥ काय जीवित्वाची धरुनियां आशा । व्हावें गर्भवासा पात्र भेणें ॥ध्रु.॥ अबाळीनें जावें निश्चिंतीच्या ठायां । रांडा रोटा वांयां करूं नये ॥२॥ तुका म्हणे बळी देतां तें निधान । भिकेसाठी कोण राज्य देतो ॥३॥