भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्णाचिया सुखें भुक नाहीं तहान । सदा समाधान सकळांचें

krushnachiya sukhen bhuk nahin tahan | sada samadhan sakalanchen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कृष्णाचिया सुखें भुक नाहीं तहान । सदा समाधान सकळांचें ॥१॥ कळलें चि नाहीं झाले किती दिस । बाहेरिल वास विसरलीं ॥२॥ विसरु कामाचा तुका म्हणे झाला । उद्वेग राहिला जावें यावें ॥३॥