भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपावंत कोप न धरावा । चित्ती छळू विक्रोक्ति स्तुती करू

krupavant kop na dharava | chitti chhalu vikrokti stuti karu

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कृपावंत कोप न धरावा । चित्ती छळू विक्रोक्ति स्तुती करू ॥१॥ आम्ही तुझा पार काय जाणो देवा । नेणो कैसी सेवा करावी ते ॥ध्रु.॥ अनंत अरुपा अलक्षा अच्युता । निर्गुणा सचिता सर्वोत्तमा ॥२॥ चांगली हि नामे घेतली ठेऊन । जालासी लहान भक्तीकाजा ॥३॥ तुका म्हणे तुझ्या पायावरी सदा । मस्तक गोविंदा असो मज ॥४॥