भजनी मालिका
← भजनांकडे परत

केला तैसा अंगीकार । माझा भार चालवीं

kela taisa angikar | majha bhar chalavin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
केला तैसा अंगीकार । माझा भार चालवीं ॥१॥ होऊं अंतराय बुद्धी । कृपानिधी नेंदावी ॥ध्रु.॥ आम्ही तरी जड जीव । कैंचा भाव सपुरता ॥२॥ अनन्यभावें घ्यावी सेवा । आम्हां देवा घडेसी ॥३॥ तुह्मीं आम्ही शरणागतें । कृपावंतें रक्षीजे ॥४॥ तुका म्हणे भाकुं कींव । असों जीव जड आम्ही ॥५॥