भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय महती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावे ॥१॥ तैसे पूजिती आम्हां संत । पूजा घेतो भगवंत । आम्ही किंकर संतांचे दास । संतपदवी नको आम्हांस ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

केली कटकट गाऊं नाचों नेणतां । लाज नाहीं भय आम्हां पोटाची चिंता ॥१॥ बैसा सिणलेती पाय रगडूं दातारा । जाणवूं द्या वारा उब जाली शरीरा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

केली प्रज्ञा मनाशीं । तई मी दान सत्यत्वेशीं । नेईन पायांपाशीं । स्वामी मूळ पंढरिये ॥१॥ तोंवरी हें भरीं पोट । केला तो मिथ्या बोभाट । नाहीं सांपडली वाट । सइराट फिरतसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

केलें तरी आता साचची करावे । विचारिले द्यावे कृपादान ॥१॥ संकल्पासी नाही बोलिला विकल्प । तुम्हा पाप पुण्य कळे देवा ॥ध्रु॥

रचनाकार: संत तुकाराम

केलें नाहीं मनीं तया घडे त्याग । उबगें उद्वेग नाहीं चित्तीं ॥१॥ देव चि हा जाणे अंतरींचा भाव । मिथ्या तो उपाव बाह्य रंग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

केलें पाप जेणें दिलें आन्मोदन । दोघांसी पतन सारिके चि ॥१॥ विष नवनीता विष करी संगें । दुर्जनाच्या त्यागें सर्व हित ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कैचें भांडवल खरा हातीं भाव । कळवळ्यानें भाव दावीतसें ॥१॥ आतां माझा अंत नको सर्वजाणा । पाहों नारायणा निवडूनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कैसा कृपाळु हें न कळसी देवा । न बोलसी सेवा घेसी माझी ॥१॥ काय ऐसें बळ आहे तुजपाशीं । पाहों हरी घेसी कोण आड ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कैसा तू देखिला होसील गोपाळीं । पुण्यवंता डोळीं नारायणा ॥१॥ तेणें लोभें जीव जालासे बराडी । आम्ही ऐशी जोडी कई लाभों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम