भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसा तू देखिला होसील गोपाळीं । पुण्यवंता डोळीं नारायणा

kaisa tu dekhila hosil gopalin | punyavanta dolin narayana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कैसा तू देखिला होसील गोपाळीं । पुण्यवंता डोळीं नारायणा ॥१॥ तेणें लोभें जीव जालासे बराडी । आम्ही ऐशी जोडी कई लाभों ॥ध्रु.॥ असेल तें कैसें दर्शनाचें सुख । अनुभवें श्रीमुख अनुभवितां ॥२॥ तुका म्हणे वाटे देसी आलिंगन । अवस्था ते क्षणक्षणां होते ॥३॥