भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसा कृपाळु हें न कळसी देवा । न बोलसी सेवा घेसी माझी

kaisa krupalu hen na kalasi deva | na bolasi seva ghesi majhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कैसा कृपाळु हें न कळसी देवा । न बोलसी सेवा घेसी माझी ॥१॥ काय ऐसें बळ आहे तुजपाशीं । पाहों हरी घेसी कोण आड ॥ध्रु.॥ पाडियेला ठायीं तुझा थारा मारा । अवघा दातारा लपसी तो ॥२॥ आतां तुम्हां आम्हां उरी तों चि बरें । काय हें उत्तरें वाढवूनि ॥३॥ तुका म्हणे मज साह्य झाले संत । म्हणऊनि मात फावली हे ॥४॥