भजनी मालिका
← भजनांकडे परत

केलें तरी आता साचची करावे । विचारिले द्यावे कृपादान

kelen tari ata sachachi karave | vicharile dyave krupadan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
केलें तरी आता साचची करावे । विचारिले द्यावे कृपादान ॥१॥ संकल्पासी नाही बोलिला विकल्प । तुम्हा पाप पुण्य कळे देवा ॥ध्रु॥ उदार विख्यात तुम्ही भूमंडळी । ऐसी ब्रीदावळी गर्जतसे ॥२॥ तुका म्हणे अहो रखुमाईच्या वरा । उपरोध धरा माझा आता ॥३॥