भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैं वाहावें जीवन । कैं पलंगीं शयन

kain vahaven jivan | kain palangin shayan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कैं वाहावें जीवन । कैं पलंगीं शयन ॥१॥ जैसी जैसी वेळ पडे । तैसें तैसें होणें घडे ॥ध्रु.॥ कैं भौज्य नानापरी । कैं कोरड्या भाकरी ॥२॥ कैं बसावें वहनीं । कैं पायीं अनवाणी ॥३॥ कैं उत्तम प्रावर्णे । कैं वसनें तीं जीर्णे ॥४॥ कैं सकळ संपत्ती । कैं भोगणें विपत्ती ॥५॥ कैं सज्जनाशीं संग । कैं दुर्जनाशीं योग ॥६॥ तुका म्हणे जाण । सुख दुःख तें समान ॥७॥