भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपावंता दुजें नाहीं तुम्हां पोटीं । लाडें बोलें गोठी सुख मातें

krupavanta dujen nahin tumhan potin | laden bolen gothi sukh maten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कृपावंता दुजें नाहीं तुम्हां पोटीं । लाडें बोलें गोठी सुख मातें ॥१॥ घेउनि भातुकें लागसील पाठी । लाविसील ओंठीं ब्रम्हरस ॥ध्रु.॥ आपुलिये पांखे घालिसी पाखर । उदार मजवर कृपाळू तूं ॥२॥ तुका म्हणे आम्हांकारणें गोविंदा । वागविसी गदा सुदर्शन ॥३॥