भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

आपणची कर्ता आपणची मित्र । आपण सर्वत्र हरी झाला ॥१॥ साधन साधितां हरि दिसे पूर्ण । प्रपंच हें भान न देखें डोळां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आपणा वेगळा कशाला निवडिसी । कां सज दवडिसी सांग नाम्या ॥१॥ बरवें पुत्रपण जालासी उत्तीर्ण । आतां अभिमान पाहें माझाअ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आपलें हित आपण नेणती । पुढिलांतें सांगती बहु ज्ञान ॥१॥ नेणोनि परब्रह्म जाणते झाले । अभावीं गुंतले माया-जाळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आपुलिया अंगें साहित्य श्रीरंगें । पुजियेले सांग संतसाधू ॥१॥ निवृत्तिदेवें केली विठोबाची पूजा । उभारिल्या ध्वजा पताकांच्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आपुली करणी न विचारी मनीं । वांयां काय ठेवूनि बोल जिवा ॥१॥ खाटकी जो चेपी पशूची नरडी । अवचिता करं-गळी सांपडली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आपुली पदवी सेवकासी द्यावी । तो एक गोसावी पांडुरंग ॥१॥ भावाचा आळुका भुलला भक्तिसुखा । सांपडला फुका नामासाठीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आपुले रूपीं मज लपवीं निरंतरीं । समाये भीतरीं आड राहे ॥१॥ परि तुज मज असावा संबादू । भ्रांति मायाबाधु करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आमुचा नामा तुज गोला निरवुसी । मी तुजवांचोनी नेणें कवणा ॥१॥ कायाबाचामनें जोडिलें जें बापें । तें दिधलें तुज पैंठवावया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आमुचा बाप आम्हां सांगे । भाक दिघली पांडुरंगें ॥१॥ तुम्हां न विसंबे सर्वथा । तुमचा भार माझ्या माथां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आमुचें ठेवणें जुगादीचें नाणें । जातां नामथानें सांगितलें ॥१॥ इतके दिवस पाहिली तुझी वाट । परि तूं उदास न बोलसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आमुच्या स्वस्थानीं नाहीं पां अंधार । अवघीं चराचर प्रकाशत्वें ॥१॥ उदयु आणि अस्तु नाहीं स्वरूपासी । ऐसें मुनि ऋषि जाणताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आम्हांपासीं काय मागसी तूं देवा । नाहीं भक्तिभाव भांडवल ॥१॥ भांडवल गांठीं देखोनि साचारा । सुदाम्याची फार पाठ घेसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आम्हावरी कांरे धरियेला राग । काय तुझें सांग आम्हीं केलें ॥१॥ रडतसों आम्हीं मारितसों हांका । विश्वाच्या जनका नायिकसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आम्ही आणि संत संत आणि आम्ही । सूर्य आणि रश्मि काय दोन ॥१॥ दीप आणि सारंग सारंग आणि दीप । ध्यान आणि जप काय दोन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आम्ही काय जाणो तुझा अंत पार । होसी तूं साचार निवारिता ॥१॥ बहु अपराधी जाण यातिहीन । पतितपावन पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आम्ही काय जाणों तुझा अंतपार । होसी निरंतर निवारिता ॥१॥ बहु अपराधी जाणा यातिहीन । पतितपावना तुम्ही देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव