भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

आकारिक नाम जीवानें ठेविलें । शिवानें तें केलें निर्विकल्प ॥१॥ जीव शिव दोन्ही विराले ज्यामाजीं । तें नाम सहजीं आद्य आहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आकाश गडगडी विद्युल्लता तळपती । अनिवार मेघ सणसणां वरुषती ॥१॥ राखियलें येणें देवकीनंदनें । गोपाळ म्ह-णती आमुचें कान्हे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आकाश वाणी होय सांगे सकळांसी । तळमळ मानसीं करूं नका ॥१॥ देवकीच्या गर्भ येईल भगवान । रक्षील ब्राह्मण गाई भक्त ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आकाशीं पुष्पक भुभ्र दंडा दिसे । बैसोनि येतसे ज्ञानदेव ॥१॥ शुद्धभावें इच्छी ज्ञानदेव भेटी । येई उठाउठी भेटूं त्यासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आक्रोशें ध्यानासीं आणी पुरुषोत्तमा । पृथ्वीयेसी क्षमा उणी आणी ॥१॥ अखंडित शुद्ध असावें अंतर । लोणिया कठोर वाटे मनीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आघात न चले आणची जवळीं । म्हणे कोण बळी साह्यकर्ता ॥१॥ कोठें राहतो कैसा कोण सांग । येरू म्हणे वेग नाहीं कोठें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आचमन करुनि आले सिद्धेश्वरा । हरि ऋषीश्वरा आर्जविती ॥१॥ निवृत्ति मुक्ताईला त्यागूं नये कोणी । आतां उत्तरायणीं गमन करूं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आजि आवतणें संतांचें । भोजन जालें हरिनामाचें ॥१॥ आम्ही जेविलोंज जेविलों । नामामृतें पूर्ण धालों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आजिचा दिवस आम्हां सोनियाचा । गोवळू भेटला कान्हो नंदाचा ॥१॥ कान्होबा पेंढारी येईल यमुने । तयावीण मज घडी न गमे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आझां संगती नावडे कांहीं । म्हणोनि झालों बा विदेही । दु:खमूळ संगतीचें । आम्ही नव्हों त्या गांवीचे ॥१॥ आम्हा नाहीं रूप नांव । वस्तीची नाहीं एक ठाब । मग ध्या इच्छेसि धांव । आम्ही नव्हों त्या गांबींचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आणिक वाद्यें तेथें वाजताती अपार । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥ चिद्रत्नमंडप दिसला कल्लोळ । जैसे दीपमाळ दीप ठेले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आणीक ही मंत्र मोक्षदानी खरे । अशौचाचा थार असूं नये ॥१॥ नाममंत्र कांहीं बाधेना कोणासी । जया अहर्निशीं रामकृष्ण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आणूनि सुरभि करी अभिषेक । येती सकळिक मरुद्नण ॥१॥ सुरवरांची दाटी करिती नमस्कार । होतसे अपार पुष्पवृष्टी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आतां आहे नाहीं पाहतां क्षण एक । संपत्तीचे सुख विषय हा ॥१॥ हित तें आचरा हित तें विचारा । नामीं भाव धरा जाणतेनो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आतां जावें वेगीं नामया घेऊनि । सांगावीं आवंतणी ब्राह्मणांसी ॥१॥ सकळकामपूर्ण असती तुमच्या पायीं । विचारावें कांहीं न लगे देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव