भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणीक ही मंत्र मोक्षदानी खरे । अशौचाचा थार असूं नये

anik hi mantra mokshadani khare | ashauchacha thar asun naye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आणीक ही मंत्र मोक्षदानी खरे । अशौचाचा थार असूं नये ॥१॥ नाममंत्र कांहीं बाधेना कोणासी । जया अहर्निशीं रामकृष्ण ॥२॥ तपाची मांडणी आकाशाचें खेव । इंद्रियांची हांव राहे तरी ॥३॥ यज्ञ तो आचार धनाचें सांकडें । तरी जाण द्वाड स्वर्गमुख ॥४॥ नामा म्हणे नाम साधकाची माता । जैसें तैसें घेताम भक्ति जोडे ॥५॥