भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकाश वाणी होय सांगे सकळांसी । तळमळ मानसीं करूं नका

akash vani hoy sange sakalansi | talamal manasin karun naka

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आकाश वाणी होय सांगे सकळांसी । तळमळ मानसीं करूं नका ॥१॥ देवकीच्या गर्भ येईल भगवान । रक्षील ब्राह्मण गाई भक्त ॥२॥ उतरीला भार मारील दैत्यांसी । आनंद सर्वांशी करील तो ॥३॥ रोहोणी उदरीं शेष बळिभद्र । यादव समग्र व्हारे तुम्ही ॥४॥ ऐकोनियां ऐसें आनंद मानसीं । येती स्वस्थळासी नामा म्हणे ॥५॥