भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां पदपदांतराची सेवा । संपादिली स्वामी केशवा

atan padapadantarachi seva | sampadili svami keshava

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आतां पदपदांतराची सेवा । संपादिली स्वामी केशवा । धन्य आमुचिया दैवा । जोडिलां तुम्ही ॥१॥ आत्मविद्या बोलावया कारणें । सुख पावले श्रोते सज्जन । आतां जें आरंभिलें मनें । तें आपण सिद्धि न्यावें ॥२॥ भूवैकुंठ एक पंढरी । ल्याहूनि आगळी आळंकापुरी । सिद्धेश्वरा शेजारीं । इंद्रायणी ॥३॥ त्रिपुटी पश्चिम मोक्षाची वाट । प्रत्यक्ष कैलास सिद्धपेठ । गोपाळपुरीं केलीं गोष्ट । चौघीजणी ॥४॥ नलगे कलियुगींचा वारा । जें जें बोलिलों जगदोद्वारा । मागितला थारा । पदीं तुझ्या ॥५॥ आतां वैराग्याचें बळ । सिद्धि प्राप्तीचें फळ । ज्ञानदेवें घेतली आळ । जाणा स्थळ आवडीचें ॥६॥