भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुली करणी न विचारी मनीं । वांयां काय ठेवूनि बोल जिवा

apuli karani na vichari manin | vanyan kay thevuni bol jiva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आपुली करणी न विचारी मनीं । वांयां काय ठेवूनि बोल जिवा ॥१॥ खाटकी जो चेपी पशूची नरडी । अवचिता करं-गळी सांपडली ॥२॥ मेलों मेलों ह्मणूनि गडबडां लोळे । परि कापी गळे आठवीना ॥३॥ आपुलें ह्मणवूनि विव्हळतसे । खदखदां हांसे दुस-र्‍यासी ॥४॥ वाटपाडयानें घर खाणोनि घेतलें । जितुकें मेळविलें तितुकें नेलें ॥५॥ आपुलें नेलें म्हणऊनि खलखळां रडे । परि घेतां दरवडे आठवीना ॥६॥ सोनाराचे घरीं पडिलेसें खाण । चोरिलें सुवर्ण तेंहि नेलें ॥७॥ आपुलें नेलें म्हणऊनि मोकलितो धाया । ठक-विल्या आयाबाया तें आठवीन ॥८॥ तराळा़चे घरीं आला असे जेव्हां । ह्मणतसे देवा काय करूम ॥९॥ दुसर्‍यासी मागतां परम सुख वाटे । आपण देतां फुटे काळीज तें ॥१०॥ जन्मवरी पोशिलें लेंकुराचे परि । हातीं घेऊनि सुरी उभा राहे ॥११॥ गर्दन सुळीं देतां म्हणे काय केलें । पुढिल्यासि मारिलें आठ-वीना ॥१२॥ नामा ह्मणे विष्णुदास ऐसे जे निर्लज्ज । त्यांसी पंढरि-राज केंवि भेटे ॥१३॥