भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचा नामा तुज गोला निरवुसी । मी तुजवांचोनी नेणें कवणा

amucha nama tuj gola niravusi | mi tujavanchoni nenen kavana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आमुचा नामा तुज गोला निरवुसी । मी तुजवांचोनी नेणें कवणा ॥१॥ कायाबाचामनें जोडिलें जें बापें । तें दिधलें तुज पैंठवावया ॥२॥ तें देगा आमुचें नको करूं विचारू । नामा तुझा डिंगरू त्याचे आम्ही ॥३॥ जुनें नाणें आमुच्या वडिलाचें ठेवणें । बहुता कष्टीं तेणें जोडियेलें ॥४॥ तें आम्हांलागोनी ठेविलें तुझ्या पायीं । आमुचें आम्हां देईं केशीराजा ॥५॥ तूं अनाथा कोंवसा दीनाचा कृपाळू । तरी आमुचा सांभाळू करीं कां वेगें ॥६॥ आमुचे संचितार्भ आम्हासी देउनी । यश घे त्रिभुवनीं म्हणे विठा ॥७॥