भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलिया अंगें साहित्य श्रीरंगें । पुजियेले सांग संतसाधू

apuliya angen sahitya shrirangen | pujiyele sang santasadhu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आपुलिया अंगें साहित्य श्रीरंगें । पुजियेले सांग संतसाधू ॥१॥ निवृत्तिदेवें केली विठोबाची पूजा । उभारिल्या ध्वजा पताकांच्या ॥२॥ पश्चिमेसी स्थळ अनादि समूळ । उघडिली शीळ समाधीची ॥३॥ म्हणती योगेश्वर अनादि या शेजा । चिद्रलें ती पूजा केली असे ॥४॥ नामा म्हणे देवा जागा निरंगनीं । युगादि हे धुणी धुपतीये ॥५॥