भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचा बाप अग्रज तुझा । तूं बा आम्हां होसी आजा

amucha bap agraj tujha | tun ba amhan hosi aja

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आमुचा बाप अग्रज तुझा । तूं बा आम्हां होसी आजा ॥१॥ कैसें आम्हां धरिलें दुरी । सांग कृपालूवा हरी ॥२॥ तूं आमुचा मूळपुरुष । आम्ही अवघे तुझे अंश ॥३॥ आम्ही तुझी तिसरी पिढी । संत जाणताती प्रौढी ॥४॥ अरे कायशीं शतें लोटलीं । कैशी लाघावळी तुटली ॥५॥ हांसोनि बोले केशीराज । विठया अवघॆं घेईं मज ॥६॥