भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुली पदवी सेवकासी द्यावी । तो एक गोसावी पांडुरंग

apuli padavi sevakasi dyavi | to ek gosavi pandurang

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आपुली पदवी सेवकासी द्यावी । तो एक गोसावी पांडुरंग ॥१॥ भावाचा आळुका भुलला भक्तिसुखा । सांपडला फुका नामासाठीं ॥२॥ प्रेमाचा जिव्हाळा नामाची आवडी । क्षण एक न सोडी संग त्याचा ॥३॥ नामा म्हणे दीनांचे माहेर । तो एक उदार पांडुरंग ॥४॥