भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपणा वेगळा कशाला निवडिसी । कां सज दवडिसी सांग नाम्या

apana vegala kashala nivadisi | kan saj davadisi sang namya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आपणा वेगळा कशाला निवडिसी । कां सज दवडिसी सांग नाम्या ॥१॥ बरवें पुत्रपण जालासी उत्तीर्ण । आतां अभिमान पाहें माझाअ ॥२॥ तुज नेल्यावीण नवजाय येथून । पंढरी गिळीन विठोबासहित ॥३॥ माझेंसी लेकरूं मज आहे वेव्हारू । मज आहे निर्धारू विठोबासी ॥४॥ हा दानवांतें छळी आपणा म्हणवी बळी । तें मजजवळी न चले कांहीं ॥५॥ विटेसहित चरणीं बांधिन आपुला गळा । क्षण जीवा वेगळा जाऊं नेदी ॥६॥ आसनीं शयनीं न विसंबे भोजनीं । घालिन मुरडोनि ह्रदयामाजीं ॥७॥ या देहाचा संकल्प आलेसें करोन । घाललेंसे पाणी घरादारां ॥८॥ हा त्रिभुवनीं समर्थ मी असें जाणत । पाहेन पुरुषार्थ आजी याचा ॥९॥ अठ्ठाविस युगें भरलीं तया बोला । धरोनि उभा केला पुंडलिकें ॥१०॥ गोणाई म्हणे देवा होई कां शहाणा । वायां कां परधना धरिसी लोभु ॥११॥